पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

पीटीआय
Friday, 30 October 2020

पाकिस्तानच्या संसदेमध्ये आज चक्क मोदी- मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्याने सगळेचजण अवाक झाले होते. बलुचिस्तानच्या खासदारांनी ही घोषणाबाजी केली. या घोषणेमुळे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा चेहरा अक्षरश: लालबुंद झाला होता. इम्रान सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी या खासदारांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये आज चक्क मोदी- मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्याने सगळेचजण अवाक झाले होते. बलुचिस्तानच्या खासदारांनी ही घोषणाबाजी केली. या घोषणेमुळे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा चेहरा अक्षरश: लालबुंद झाला होता. इम्रान सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी या खासदारांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यामध्ये इम्रान सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाक लष्करप्रमुखांचे असेही ‘अभिनंदन’
भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भातील एका बैठकीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते, त्यांना घाम फुटला होता असा दावा पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modis name announced in Pakistans parliament