esakal | PM मोदींचे नवीन सल्लागार अमित खरे कोण आहेत? | Amit khare
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Khare

PM मोदींचे नवीन सल्लागार अमित खरे कोण आहेत?

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांचे सल्लागार म्हणून मंगळवारी अमित खरे (Amit khare) यांची नियुक्ती झाली. पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती होण्याआधी अमित खरे यांनी भारत सरकारमध्ये (indian govt) वेगवेगळ्या पदांवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमित खरे हे माजी उच्च शिक्षण सचिव आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (Education policy) अमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमित खरे हे १९८५ आयएएस बॅचचे झारखंड केडरचे अधिकारी आहेत.

त्यांची दोन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सचिवाचा दर्जा असणार आहे. अमित खरे यांनी २०१८-१९ मध्ये माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून काम केले आहे. सप्टेंबरमध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. एप्रिल २०२० मध्ये पुन्हा त्यांची माहिती आणि प्रसारण खात्याच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांची उच्च शिक्षण सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी बीएससी भौतिकशास्त्रामध्ये पदवी घेतली.

हेही वाचा: अल्टिमेटम देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही - संभाजीराजे

अहमदाबाद आयआयएममधुन त्यांनी एमबीएची पदवी घेतली आहे. वसतिगृहाच्या फी वाढीवरुन जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यावेळी त्यांनी शिक्षण खात्यामध्ये सचिव पदाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, जेएनयूमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानंतर माजी उच्च शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यम यांची बदली करण्यात आली. 'द प्रिंट'ने हे म्हटले आहे.

हेही वाचा: सावरकरांबद्दल चुकीचे वाद उभे केले जात आहेत - देवेंद्र फडणवीस

१९९० साली बिहारमध्ये चारा घोटाळा उघड करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ते पश्चिम सिंघभूमचे उपायुक्त होते. आता हा पश्चिम सिंघभूम झारखंडमध्ये आहे. या प्रकरणात बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव दोषी ठरले होते.

loading image
go to top