esakal | सावरकरांबद्दल चुकीचे वाद उभे केले जात आहेत - देवेंद्र फडणवीस | Devendra fadnavis
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

सावरकरांबद्दल चुकीचे वाद उभे केले जात आहेत - देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Savarkar) यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात (andman jail) काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे (british) दया याचिका (mercy petition) दाखल केली होती, असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. त्यावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वत: याचिका दाखल केली नव्हती. त्यांच्याबद्दल चुकीचे वाद तयार केले जात आहेत, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकारांनी त्याकाळात अनेकांच्या याचिका तयार केल्या. पण स्वत: याचिका केली नाही. त्यांना आग्रह झाला, तेव्हा त्यांनी ती याचिका केली. हा इतिहासाचा भाग आहे" असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: 'अजूनही यौवनात मी', फडणवीसांवर संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी

"सावरकर हे सर्वात जास्त काळ, सर्वात अडचणीच्या परिस्थितीत सेल्युलर जेलमध्ये राहिले आहेत. खरी काळ्यापाण्याची शिक्षा ज्यांनी भोगली, त्यापैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जे वाद उभे केले जातात, ते चुकीचे वाद आहेत" असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: 'कुटूंब संकटात असेल तेव्हा', शाहरुख काय म्हणाला होता सलमानला?

संजय राऊत काय म्हणाले....

"राजकारण, तुरुंगवासात असताना काहीवेळा रणनीती ठरवावी लागते. दहावर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येऊन कार्य करावं, असं वाटलं. अशा परिस्थितीत जगभरात तुरुंगाबाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत, तो मार्ग अवलंबला म्हणून त्याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही" असे संजय राऊत म्हणाले.

loading image
go to top