मोदींच्या भाषणास राज्यसभेत कात्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणातील काही भाग अधिकृत कामकाज नोंदींमधून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणाला संसदीय कामकाजातून कात्री लागण्याचा प्रसंग अतिशय अपवादात्मक म्हणूनच दुर्मिळातील दुर्मिळ मानला जात आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणातील काही भाग अधिकृत कामकाज नोंदींमधून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणाला संसदीय कामकाजातून कात्री लागण्याचा प्रसंग अतिशय अपवादात्मक म्हणूनच दुर्मिळातील दुर्मिळ मानला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसदेतील कामकाजातून अनेकदा असंसदीय व आक्षेपार्ह-असभ्य टिप्पणी व वक्तव्ये अनेकदा काढून टाकण्यात येतात. मात्र पंतप्रधानांच्या भाषणाला कात्री लागण्याचे प्रसंग अत्यंत विरळा असतात. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काल (ता. ६) केलेल्या काही उल्लेखांवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीची (एनपीआर) ंमलबजावणी काँग्रेसनेच २०१० मध्ये सुरू केली होती व २०१५ मध्ये फक्त त्यात काही दुरुस्त्या केलेल्या आहेत व माझ्या सरकारने आता कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींची नावे निश्‍चित करताना त्याचाच आधार घेतल्याचे मोदी यांनी नमूद केले होते.

राम मंदिर ट्रस्टमधील एकमेव दलित सदस्य आहेत तरी कोण?

काँग्रेसने या मुद्यावर कोलांटउडी मारल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुमचा एनपीआर तो चांगला व तोच आम्ही जनकल्याणासाठी वापरला की वाईट होतो काय? असे विचारताना पंतप्रधानांनी वापरलेल्या काही शब्दांना विरोधकांनी आक्षेप घेतला. मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष पी. एल. पुनिया, दलितांच्या प्रश्‍नांवर पोटतिडकीने बोलणाऱ्या कुमारी शैलजा आदी पंतप्रधानांच्या त्या उल्लेखानंतर चांगलेच भडकले.

मी कामकाज तपासून असंसदीय व आक्षेपार्ह काही आढळले तर ते कामकाजातून काढून टाकेन, असे सभापती नायडू यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी आज पंतप्रधानांच्या भाषणातील एक शब्द कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले, अशी माहिती राज्यसभा सचिवालयाने सायंकाळी उशिरा दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modis speech in the Rajya Sabha