Mohammad Roshan : राज्यात 21 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मोहम्मद रोशन बेळगावचे नवे जिल्हाधिकारी, नीतेश पाटलांची बदली

बेळगावचे जिल्हाधिकारी (Collector of Belgaum) नीतेश पाटील यांची बदली झाली आहे.
Mohammad Roshan
Mohammad Roshanesakal
Summary

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी पाटील यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू होती, ती चर्चा खरी ठरली आहे.

बेळगाव : बेळगावचे जिल्हाधिकारी (Collector of Belgaum) नीतेश पाटील यांची बदली झाली आहे. मोहम्मद रोशन (Mohammad Roshan) यांची बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ५) सकाळी पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाकडून राज्यातील २१ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Mohammad Roshan
नवीन मराठा-कुणबी राहणार 'महावितरण' भरतीपासून वंचित! 'ओबीसी'त समावेशाचा विकल्प नसल्याने धास्ती

त्यात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी पाटील यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू होती, ती चर्चा खरी ठरली आहे. त्यांची बदली सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक या पदावर झाली आहे. मोहम्मद रोशन हे हुबळी वीज वितरण कंपनी म्हणजे हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या कार्यकाळातच राज्य शासनाच्या गृहज्योती योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. आता ते बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले आहेत. बीटेक व एमबीए (फायनान्स) पदवीधर असलेले मोहम्मद रोशन हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. याआधी त्यानी हावेरी व कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.

Mohammad Roshan
'शंभूराज देसाईंना शोधा आणि एक गावठी कोंबडा, वळगणीचे मासे बक्षीस जिंका'; शरद पवार गटाच्या 'या' बॅनरची जोरदार चर्चा

कर्नाटकातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. नीतेश पाटील हे ५ मे २०२२ रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते. तत्‍कालीन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ सेवानिवृत्त झाल्यावर पाटील यांची बेळगाव जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. दोन वर्षे त्यांनी बेळगावात सेवा बजावली. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतरच पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती, पण त्यांची बदली झाली नव्हती.

Mohammad Roshan
आर्थिक व्यवहारातून चक्क डॉक्टरचा एकावर जीवघेणा हल्ला; लाथाबुक्क्यांनी मारहाण, आई-वडिलांसह पत्नीला केली शिवीगाळ

पाटील यांच्या कार्यकाळात बेळगावात विधिमंडळाची दोन अधिवेशने यशस्वीपणे पार पडली आहेत. मावळते जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांच्याकडून मोहम्मद रोशन यांनी पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com