नवी दिल्ली: आरएसएसच्या शंभर वर्षेपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय संमेलनाच्या शेवटच्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानंतर त्यांच्या सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याच्या अटकळांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी फेटाळून लावले आहे. भाजप आणि संघाच्या परंपरेनुसार ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर नेते सक्रिय राजकारणातून बाजूला होतात, असे म्हटले जात होते.