

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूरमधील आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीची ताकद आणि समाजाची भूमिका यावर भर दिला. जगभरातील अनेक संस्कृती संपल्या आहेत, परंतु भारत टिकून आहे कारण हिंदू समाजाने एक मजबूत सामाजिक रचना निर्माण केली आहे.जर हिंदू अस्तित्वात नसतील तर जग अस्तित्वात राहणार नाही, कारण केवळ हिंदू समाजच धर्माचे योग्य मार्गदर्शन प्रदान करतो, असे मोहन भागवत म्हणाले.