Simhastha 2028: रस्ता रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे वडिलोपार्जित घरही जाणार, स्वतःच मारली कुदळ video viral

Mohan Yadav Ancestral House, Ujjain Road Widening, Simhastha 2028 सिंहस्थ २०२८च्या तयारीसाठी उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरण सुरू असून मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलोपार्जित घराचा २.९० मीटर भाग बाधित झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः कुदळ चालवून कामाची सुरुवात केली.
madhya pradesh cm mohan yadav home

madhya pradesh cm mohan yadav home

esakal

Updated on: 

उज्जैन: सिंहस्थ महाकुंभ-२०२८च्या तयारीसाठी उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू झाली आहेत. या कामाच्या कक्षेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे वडिलोपार्जित घरही आले आहे. २७ सप्टेंबर रोजी उज्जैनला पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर विधिवत पूजा-अर्चा केली आणि त्यानंतर स्वतः कुदळ चालवत घराचा बाधित भाग हटवण्याच्या कामाची सुरुवात केली. या वेळी बालपणाच्या आठवणींशी जोडलेल्या घराचा भाग हटवताना ते भावूक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com