

CM Mohan Yadav
esakal
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज (२५ मार्च २०२६) आपल्या आयुष्याच्या ६२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून, मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचा मार्ग निवडला आहे.
आजच्या खास दिवशी मुख्यमंत्री वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पात (सागर-दमोह-नरसिंगपूर जिल्हा) उपस्थित राहून राज्याच्या वन्यजीव पर्यटनासाठी मैलाचा दगड ठरणारे निर्णय घेणार आहेत.