Money
MoneySakal

Delhi Election : निवडणुकांच्या झाडांना लागलेत पैसेच पैसे

मराठी मध्ये म्हण आहे, `पैसै काही झाडाला लागत नाहीत.’ एखादया गरजूने सधन माणसाकडे पैशाची मागणी केली की तो म्हणतो, `एवढे पैसे देणे शक्य नाही, अहो, पैसे काय झाडाला लागलेत?’
Published on

मराठी मध्ये म्हण आहे, `पैसै काही झाडाला लागत नाहीत.’ एखादया गरजूने सधन माणसाकडे पैशाची मागणी केली की तो म्हणतो, `एवढे पैसे देणे शक्य नाही, अहो, पैसे काय झाडाला लागलेत?’ तोच माणूस सावकाराकडे गेला, की त्याची गरज व कर्ज परतफेड करण्याची आर्थिक ताकद पाहून तो कर्ज देतो व त्यावर कधी साधे तर कधी चक्रव्याढ दराने कर्ज परतफेडीची अट घालतो.

आपल्या देशात कर्ज परतफेड न केल्याने पिढ्या न पिढ्या कर्जबाजारी अथवा वेठबिगार झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. अखेर, पैसा कुणाला नको असतो? हल्ली महागाईच्या काळात तो सर्वांना हवा असतो. तसेच, काही फुकट मिळत असल्यास ते घेण्यासाठी लोकांची झुंबड लागते. कर्जबाजारी झाल्याने वा अवर्षणाने अथवा पुरांनी पिके वाहून गेल्यावर कर्जबाजारी झालेले लाखो शेतकरी आपण नित्याने पाहात आहोत. ते फेडू न शकल्याने आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्यापुढ कोणताही पर्याय उरत नाही. पण, अशा नित्याने होणाऱ्या आत्महत्याकडे, ``सरकार हे रोजचचे आहे,’’ अशी भूमिका घेऊऩ, तर कधी त्यांची कर्जमाफी करून मार्ग काढत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com