
प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा
मुंबई : येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी कॉंग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात धक्कादायक खुलासे केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाला (ED) सांगितले की, काँग्रेसच्या प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडून 'एमएफ हुसेन पेंटिंग' विकत घेण्यास "बळजबरी" करण्यात आली होती आणि त्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये वापरली होती. असं त्यांनी फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
तसेच पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी एमएफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिला तर केवळ गांधी घराण्याशी संबंध निर्माण करण्यापासून रोखले जाणार नाही तर 'पद्मभूषण' पुरस्कार मिळण्यापासून देखील रोखले जाईल. असा इशारा आपल्याला दिला असल्याचं कपूर यांनी ईडीला सांगितलं. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राणा कपूर आणि त्यांचे कुटुंबिय, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक कपिल आणि धिरज वाधवान यांच्याविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी राणा कपूर यांनी ईडीला बोलताना हे विधान केले आहे.
हेही वाचा: नरेंद्र मोदी पोहोचण्याआधीच जम्मूत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, छावणीचं स्वरुप
राणा यांनी सांगितलं की दिवंगत मुरली देवरा यांचा मुलगा आणि कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आपल्याला सांगितलं की, तुम्ही दिलेला २ कोटींचा धनादेश हा सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरला गेला आहे असं देवरा यांनी आपल्याला सांगितल्याचं कपूर यांनी सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी यांचे जवळचे विश्वासू व्यक्ती अहमद पटेल यांनी, सोनिया यांच्या उपचारासाठी योग्य वेळी मदत करुन मोठं काम केलं आहे त्यामुळे ते पद्मभूषण पुरस्कारासाठी तुमचा योग्य विचार करतील असं सांगितलं होतं.
त्याचबरोबर हे पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांचे गांधी कुटुंबाशी संबंध निर्माण होऊ देणार नाही तसेच पद्मभूषण मिळण्यापासूनही रोखले जाईल, तसेच हे पेंटिंग खरेदी केलं नाही तर येस बॅंकेवरसुद्धा परिणाम होणार आहेत असं मुरली देवरा यांनी सांगितल्याचं कपूर यांनी ईडीला बोलताना सांगितलं. ते म्हणाले की हे पेंटिंग विकत घेण्यास मी कधीही तयार नव्हतो, त्या खरेदीसाठी मला सक्ती करण्यात आली होती असं कपूर खरेदी केलेल्या पेटिंगबद्दल ईडीला सांगितलं आहे.
हेही वाचा: नरेंद्र मोदी पोहोचण्याआधीच जम्मूत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, छावणीचं स्वरुप
दरम्यान राणा कपूर आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवन यांनी संशयास्पद व्यवहारांद्वारे 5,050 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे.
Web Title: Money Laundering Case Rana Kapur Priyanka Gandhi Painting 2 Crore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..