Video: धाडसी आजीने वाजवली नागाची पुंगी...

वृत्तसंस्था
Wednesday, 27 May 2020

नाग पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण, एका आजीने नागाची शेपटी धरली आणि फरफटत घराबाहेर ओढत नेले आणि भिरकावून दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : नाग पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण, एका आजीने नागाची शेपटी धरली आणि फरफटत घराबाहेर ओढत नेले आणि भिरकावून दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेहऱ्यावरून ओढणी काढली अन् पकडला गेला...

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. कोब्रा जातीच्या सापासोबत आजीची ही वागण्याची पद्धत योग्य नाही असे त्यांनी शीर्षक दिले आहे. संबंधित व्हिडिओ 26 सेकंदाचा असून, लाखो नेटिझन्सनी पाहताना प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही नेटिझन्सनी आजीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. आजीने या सापापासून स्वत:चे संरक्षण केले तर काहींनी टीकाही केली आहे.

...अखेर तिने नोकरी सोडली अन्

संबंधित व्हिडिओमध्ये आजीने नागाच्या शेपटीला दोरीसारखे पकडले आहे. नागाला मोकळ्या जागेत फरफटत घेऊन गेली आणि भिरकावून दिले. कोब्रा आणि नाग शब्द उच्चारला तरी भल्या भल्यांची बोबडी वळते तिथे आजींने हिम्मत दाखवून नागाची पुंगी वाजवल्याचे दिसत आहे. आजीच्या या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fearless grandmother drags cobra ifs office sushant nanda twitted video viral