Monkeypox : दिल्लीत आढळला ५वा रुग्ण; २२ वर्षीय महिला रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Monkeypox Latest News

Monkeypox : दिल्लीत आढळला ५वा रुग्ण; २२ वर्षीय महिला रुग्णालयात दाखल

Delhi Monkeypox Latest News नवी दिल्ली : दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) पाचवा रुग्ण आढळला आहे. नायजेरियाला गेलेल्या आफ्रिकन वंशाच्या २२ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची पुष्टी झाल्यानंतर उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व बाधित आणि संशयित रुग्णांवर डॉक्टरांचे पथक उपचार करीत आहे. या महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले आहे. ती सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, असे लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी शनिवारी सांगितले.

दिल्लीत मंकीपॉक्सचे (Monkeypox) एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. काल महिला पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांचे पथक उपचार करीत आहे. या महिलेचा कोणताही अलीकडील प्रवासाचा इतिहास नाही. परंतु, तिने एक महिना आधी प्रवास केला होता. केंद्र सरकारने भारतात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यापैकी एक म्हणजे देशातील प्रवेश बिंदूंवर पाळत ठेवणे.

हेही वाचा: संजय राठोड, भावना गवळींविरोधात शिवसैनिक आक्रमक; बाळासाहेबांचा फोटो काढला

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आजारी व्यक्ती, मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतर लोकांशी जवळचा संपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतातील मंकीपॉक्सचा पहिला केस (Patient) १४ जुलै रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात आढळून आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोसिस (प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरलेला विषाणू) आहे. याची लक्षणे भूतकाळात स्मॉलपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसल्यासारखीच आहेत, जरी ती वैद्यकीयदृष्ट्या कमी गंभीर आहे.

Web Title: Monkeypox Fifth Patient Delhi International Travelers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiPatientMonkeypox