Monkeypox: भारतातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण झाला बरा, चेहऱ्यावरील डागही झाले बरे

आत्ताचा अहवालही आला निगेटिव्ह
Monkeypox
Monkeypoxesakal

कोरोनाच्या भीतीतून संपूर्ण जग सावरलेही नव्हते की आता मंकीपॉक्सने तणाव वाढवला आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये भारतातील पहिला रुग्ण आढळला होता. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी दिलासादायक बातमी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स झालेला रुग्ण बरा झाला आहे. त्यांचा आत्ताचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोल्लममधील एका 35 वर्षीय महिलेमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना तिरुअनंतपुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याचे दोन नमुने घेण्यात आले, दोन्ही निगेटिव्ह आले. त्याचे मानसिक आरोग्यही पूर्णपणे ठीक आहे. याशिवाय या आजारामुळे त्यांच्या चेहऱ्यावर डाग होते, उपचारानंतर तेही निघून गेले आहेत.

Monkeypox
Monkeypox : मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय डॉक्टर सांगतायत उपाय

आरोग्य विभागाच्या पथकाने खबरदारी म्हणून रुग्णाच्या कुटुंबीयांचीही तपासणी केली होती. या सर्वांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. ते पुढे म्हणाल्या की, देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच घटना असल्याने, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेच्या (एनआयव्ही) सूचनेनुसार 72 तासांच्या अंतराने दोनदा चाचण्या घेण्यात आल्या. त्याच वेळी, हा विषाणू आणखी दोन व्यक्तींमध्ये आढळून आला. त्यांची प्रकृतीही समाधानकारक असून, त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

लस बनवण्याचे प्रयत्न सुरू

आता भारताने मंकीपॉक्सची लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी मॅसिपॉक्सच्या विषाणूच्या रूग्णांचे क्लिनिकल नमुने यशस्वीरित्या वेगळे केले आहेत.

Monkeypox
Pune: Monkeypox चा जिवंत व्हायरस सापडला, आता उपचार होणार सोपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com