मॉन्सून यंदा 6 जूनला केरळात, महाराष्ट्रात 11 ला

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

सर्वसाधारणपणे केरळात 1 जूनला मॉन्सून दाखल होण्याचे संकेत असतात. काही वेळा तो आधी तर काही वेळा नंतरही दाखल होतो. यंदाही मॉन्सून पाच दिवस उशिरा दाखल होईल. यातही चार कमी-अधिक दिवसांची तफावत धरली जाते.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणच्या तुलनेत काहीसे उशिरा होणार आहे. मॉन्सून ६ जूनला केरळात दाखल होणार असून, यानंतर पाच दिवसांनी (11 जून) महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सर्वसाधारणपणे केरळात 1 जूनला मॉन्सून दाखल होण्याचे संकेत असतात. काही वेळा तो आधी तर काही वेळा नंतरही दाखल होतो. यंदाही मॉन्सून पाच दिवस उशिरा दाखल होईल. यातही चार कमी-अधिक दिवसांची तफावत धरली जाते.

आगमन उशिर होण्यात स्थानिक स्थितीतील हवामानातील बदलांचा सतत होणार प्रभाव मॉन्सून मार्ग प्रभावित करत असतो, यामुळे मॉन्सूनच्या निर्धारित तारखेपेक्षा कालावधीत फरक पडतो.

मॉन्सूनचे आगमन
वर्ष---- आगमन
२०१४ -- ६ जून
२०१५ -- ५ जून
२०१६ -- ८ जून
२०१७ --३० मे
२०१८ - २९ मे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon arrive in Kerala on 6th June predicts IMD