Monsoon India 2026 : मान्सूनने देश व्यापला ! मुंबईत २७ वर्षांचा विक्रम मोडीत, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

IMD Weather Update : ९ जुलैपर्यंत नैऋत्य मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला असून पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली आहे. मुंबईत २७ वर्षांतील विक्रमी पाऊस (१ जून–७ जुलै दरम्यान 1240 मिमी) नोंदला गेला आहे.
Monsoon India 2026 : मान्सूनने देश व्यापला ! मुंबईत २७ वर्षांचा विक्रम मोडीत, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Updated on

नैऋत्य मॉन्सूनने गुरुवारी (९ जुलै) संपूर्ण देश व्यापला आहे. मॉन्सूनच्या उत्तरेकडील प्रगती दरम्यान सुरुवातीला राज्यात आणि देशभरात असलेली पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भरून निघाली आहे. उत्तर भारतापासून मध्य भारत, ईशान्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन पूर्ण झाले आहे. अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com