esakal | वातावरणात बदल, मॉन्सून ३ जूनला केरळात - IMD
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

वातावरणात बदल, मॉन्सून ३ जूनला केरळात - IMD

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : यंदा मॉन्सून केरळमध्ये वेळेत ३० जून रोजीच दाखल होईल असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलं होतं. मात्र, वातावरणीय बदलामुळं यामध्ये बदल झाला असून मॉन्सून आता ३ जून रोजी केरळमध्ये बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं (IMD) ट्विट करुन याबाबत माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. (Monsoon likely to hit Kerala by June 3 says IMD)

IMD च्या माहितीनुसार, "नैऋत्य मोसमी वारे उत्तर भारतातून वाहणार असल्याने पुढील पाच दिवसांत ईशान्य भारतातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. हेच वारे पुढील पाच दिवसांत केरळ आणि मालदीवची राजधानी माले या शहरातून वाहणार असल्याने तिथं मुसळधार पाऊस कोसळेल. तसेच कर्नाटकातील किनारी भागात १ ते ३ जून या काळात पावसाच्या सरी कोसळतील. तर दक्षिण कर्नाटकात २ आणि ३ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीवर सुमारे ३ किमी अतंरावर चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे अधिक सक्षम होतील असंही IMDनं म्हटलं आहे.

राजस्थानात उष्णतेची लाट

मॉन्सूनच्या पावसासाठी वातावरणातील हे काही महत्वाचे बदल कारणीभूत ठरतील. त्यामुळे कर्नाटक, केरळ, माहे आणि दक्षिण द्विपकल्पात येत्या चार ते पाच दिवसा वादळीवाऱ्यांसह पावसाला सुरुवात होईल, असंही IMD नं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामुळे पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात खूप मोठा बदल दिसून येणार नाही. मात्र, हवामानाच्या या स्थितीमुळे पश्चिम राजस्थानात आज उष्णतेची लाट आल्याची स्थिती अनुभवायला मिळाली.

दरम्यान, भारतात नैऋत्य मोसमी वारे हे सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होतात. त्यानंतर अंदमान-निकोबार बेटे आणि पुढे पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागात दाखल होतात. त्यामुळे देशात सर्वात आधी मॉन्सूनच्या सरी या केरळमध्येच कोसळायला सुरुवात होते.

loading image
go to top