esakal | जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईमध्ये 

बोलून बातमी शोधा

monsoon-rains-mumbai

या वर्षी वेळेवर केरळमध्ये मान्सून धडक देईल.अंदमानमधील मान्सूनचे आगमन२०ते२५मेच्या अलीकडे१६मेपर्यंत आल्याने देशातील त्याचा प्रवासही नेहमीच्या अपेक्षित वेळेत असेल असाही अंदाज आहे

जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईमध्ये 
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - नैऱ्ऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर येत्या शनिवारी (ता. १६) धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात यंदा सरासरीइतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात माॅन्सून दाखल होईल असा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील परिस्थितीवर भारतातील मॉन्सूनचे चक्र अवलंबून असते. कोरोना लाॅकडाउनमुळे जगभरातील हवामानावरही यंदा परिणाम झालेले आहेत. अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो अंदमान १६ मेपर्यंत दाखल होऊ शकणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वर्षी वेळेवर म्हणजे एक जूनला केरळमध्ये मान्सून धडक देईल. अंदमानमधील मान्सूनचे आगमन २० ते २५ मेच्या अलीकडे १६ मेपर्यंत आल्याने देशातील त्याचा प्रवासही नेहमीच्या अपेक्षित वेळेत असेल असाही अंदाज आहे. यंदा जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीइतका पाऊस होईल असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे.