
मान्सूनने यंदा गूडन्यूज दिली असून गेल्या १७ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून २७ मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सध्या मान्सून निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. याशिवाय दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात ६ जूनपर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.