
Monsoon Alert: नैऋत्य मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. हवामानाचाहा अंदाज खरा ठरला तर यावर्षी मान्सून २५ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, जो गेल्या वर्षीपेक्षा पाच दिवस आधीच असेल. मागील वर्षी मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र महाराष्ट्रात येण्यास विलंब लागला होता. यावेळीही मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होणार का याकडे लक्ष लागले आहे.