
मान्सून पुढील दोन दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार - IMD
यंदा वेळेआधीच मान्सूम केरळध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ निवळत असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे विनाअडथळा मान्सून दाखल होणार आहे.
हेही वाचा: गुडन्यूज! मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात
दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५ मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान अगोदर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राज्यातील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असलेली उष्णतेची लाट पुढचे दोन तीन दिवस कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मान्सून पुढील दोन दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मेच्या दरम्यान दाखल होतो. मात्र अनुकूल स्थितीमुळे तो पाच दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार बेटांचे संपूर्ण क्षेत्र, अंदमानचा समुद्र आणि मध्य-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापेल, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदा केरळातही वेळेआधी मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खूशखबर आहे.
हेही वाचा: प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार? नेत्यांच्या मागणीमुळे चर्चा
पुढील चार आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्यची शक्यता आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
Web Title: Monsoon Update Arrives In Bay Of Bengal Upcoming 48 Hours Says Imd
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..