
प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार? नेत्यांच्या मागणीमुळे चर्चा
काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर (Congress Chintan Shivir) गेल्या तीन दिवसांपासून राजस्थानमधल्या उदयपूर इथं सुरू आहे. या शिबिरात तरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं. दरम्यान या शिबिरात प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) काँग्रेसचं अध्यक्ष करण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.
हेही वाचा: काँग्रेस चिंतन शिबिर : '२०२४ साठी आघाडीला पाठिंबा, पण...', खर्गेंनी मांडली भूमिका
अध्यक्ष सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी आचार्य प्रमोद कृष्णन यांनी हा मुद्दा मांडला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अध्यक्ष व्हावे, ही सगळ्यांची इच्छा आहे, त्यांनी हे पद स्वीकारावं यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न चाललेत. पण ते तयार नाहीत.असं असेल तर मग अध्यक्षपद प्रियंका गांधींकडे सोपवा, अशी मागणी कृष्णन यांनी केली. त्यांच्या या मागणीला अनेक काँग्रेस नेत्यांनी पाठिंबाही दर्शवला.
हेही वाचा: चिंतन शिबिर : अल्पसंख्याकांना काँग्रेस पक्षात ५० टक्के कोटा!
प्रियंका गांधींना केवळ उत्तर प्रदेशपुरतं मर्यादित ठेवणं योग्य नसल्याचं मतही अनेक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलं आहे. दोन वर्षांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही, तेव्हा आधी स्वतःचं घर मजबूत करू, मग भाजपाशी लढू, यावर सर्व नेत्यांचं एकमत झालंय. ऑगस्टपर्यंत अध्यक्षाची निवड करायची आहे. पण अजून याबद्दलचं चित्र स्पष्ट झालेलं नाही.
Web Title: Priyanka Gandhi Vadra Should Be Congress President Says Congress Leaders In Chintan Shivir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..