
Weather Update : मान्सून केरळपासून पुढे सरकला असून गोव्याच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. लवकरच मान्सून कोकणात प्रवेश करेल. पुढील काही तासांमध्ये मान्सून कोकणात दाखल होऊ शकतो. कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतही आज पहाटेपासून काळ्या ढगांनी गर्दी केली आहे.