
या घटनेनंतर भाजप नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे डझनभर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केलाय.
भाजप नेत्याच्या कारची स्कूटीस्वाराला जोरदार धडक, संतप्त जमावानं धू-धू धुतला
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये (Moradabad Uttar Pradesh) एका भाजप नेत्याला जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंज बाजार येथील आहे. भाजप किसान मोर्चाचे (BJP Kisan Morcha) पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस दिनेश ठाकूर (BJP leader Dinesh Thakur) यांच्यावर जमावानं दारूच्या नशेत हल्ला केल्याचा आरोप होत आहे. मारहाणीची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून भाजप नेत्याची सुटका करून पोलीस ठाण्यात नेलंय. दरम्यान, जमावानं मारहाण केल्याची तक्रार भाजप नेत्यानं दिलीय.
भाजप (BJP) नेते दिनेश ठाकूर रात्री उशिरा एका लग्न समारंभातून परतत होते. यादरम्यान त्यांच्या भरधाव कारनं स्कूटीस्वाराला धडक दिली, यात स्कूटीस्वार गंभीर जखमी झाला. स्कूटरस्वाराला उपचारासाठी खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आलंय. त्याचवेळी पोलीस (Moradabad Police) ठाण्यात नेल्यानंतर भाजप नेत्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या घटनेनंतर माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशानं मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यानं केलाय.
हेही वाचा: शिक्षक भरती घोटाळा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी
दरम्यान, भाजप नेत्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर भाजप नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे डझनभर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केलाय, तर व्हिडिओच्या आधारे पोलिस पुढील कारवाई करत आहेत. गर्दीतील काही लोकांनी आरोप केलाय की, भाजप नेता स्कूटीस्वाराला धडकल्यानंतर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण आम्ही त्याला पकडलं, असं त्यांनी नमूद केलंय.
Web Title: Moradabad Bjp Leader Hit Scooty Rider With Speeding Car Public Beat Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..