
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 10 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर गेल्या वर्षी चौटाला यांची सुटका झाली होती.
शिक्षक भरती घोटाळा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दल (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं (Rouse Avenue Court) दोषी ठरवलंय. ओम प्रकाश चौटाला यांच्या शिक्षेवर 26 मे रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी ओम प्रकाश चौटाला हेही कोर्टात हजर राहणार आहेत. या खटल्यात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी निर्णय राखून ठेवला होता.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी (Teacher recruitment scam) 10 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर गेल्या वर्षी चौटाला यांची सुटका झाली होती. त्यांना दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला यांची 2013 मध्ये तुरुंगात रवानगी झाली होती. चौटाला व्यतिरिक्त, त्यांचा मुलगा अजय चौटाला आणि इतर 53 जणांना 2000 मध्ये हरियाणातील 3206 कनिष्ठ मूलभूत शिक्षकांच्या बेकायदेशीर भरतीसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि शिक्षा सुनावण्यात आली. जानेवारी 2013 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयानं या सर्वांना वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा: ..तर आम्ही ते खपवून घेणार नाही; 'लाल महाल'प्रकरणी उदयनराजेंचा थेट इशारा
ओम प्रकाश चौटाला यांनी अलीकडेच वयाच्या 87 व्या वर्षी हरियाणा बोर्डातून (Haryana Board) 10 वी आणि 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी 2021 मध्ये हरियाणा ओपन बोर्ड अंतर्गत 12 वीची परीक्षा दिली होती. मात्र, तोपर्यंत दहावीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यानं त्याचा निकाल रोखण्यात आला होता. गेल्या वर्षी 10 वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये त्यांना 100 पैकी 88 गुण मिळाले होते.
Web Title: Delhi Rouse Avenue Court Convicts Former Haryana Cm Om Prakash Chautala In Disproportionate Assets Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..