esakal | ...तर वारंवार सर्जिकल स्ट्राईक करू, गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला दिला दम
sakal

बोलून बातमी शोधा

Home Minister Amit Shah

...तर वारंवार सर्जिकल स्ट्राईक करू, अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला दम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit shah) यांनी पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक (Pakistan) करण्याचा दम दिला आहे. पाकिस्तानने जर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि काश्मीरमधील नागरिकांची हत्या करणं थांबवलं नाही, तर आम्ही सर्जिकल स्ट्राईकने त्याला उत्तर देऊ. आता आम्ही कुठलेही हल्ले सहन करणार नाही. प्रत्येकवेळी सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला दिला आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांच्यावर पीडित महिलेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप

गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. कोणताही देश भारताच्या सीमांवर आक्रमण करू शकत नाही, असा संदेश या सर्जिकल स्ट्राईकमधून देण्यात आला होता. त्यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत होतो. मात्र, बदला घेण्याची वेळ आलेली आहे, असेही शाह म्हणाले.

भारतातील उरी, पठाणकोट आणि गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. यामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. उरीवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जवळपास ११ दिवसांनी २९ सप्टेंबरला ही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती.

loading image
go to top