esakal | महिला आयोग अध्यक्षपदी असताना वाघ यांनी पीडितेला ब्लॅकमेल केलंय, चव्हाणांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

चित्रा वाघ यांच्यावर पीडित महिलेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून (state women commission) नवीनच वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, निवड होण्यापूर्वी चित्रा वाघ यांनी 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा त्याठिकाणी बसवू नका' असं ट्विट केलं होतं. त्यावरूनच आता विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यावर टीका केली आहे. तसेच चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

हेही वाचा: 'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट

चित्रा वाघ यांनी महिला आयोग नेमणुकीबाबत जे ट्विट केले आहे हे बरोबर नाही. अद्याप महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक न होता चाकणकर यांना शूर्पणखा ठरविणे हे शोभणारे नाही. महिला म्हणून चित्रा वाघ यांनी बोलताना भान ठेवावे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.

''चित्रा वाघ या लोकांना राष्ट्रवादीत असतानाही पैशासाठी ब्लॅकमेल करायच्या. राज्यातील महिला अत्याचाराचे प्रश्न सुटावेत यासाठी आयोगाची नेमणूक करणे गरजेचे आहे. अशावेळी फक्त आरोप करणे चुकीचे आहे. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना भाजपच्या आमदाराने एका महिलेवर अत्याचार केले होते. त्यावेळी वाघ यांनी या महिलेला तीन दिवस स्वतःच्या घरी ठेवत पैश्यांची मागणी केली होती'', असे गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी केले आहेत.

loading image
go to top