Cyclone Mandous : मंडस चक्रीवादळामुळं १० हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mandous cyclone

Cyclone Mandous: मंडस चक्रीवादळामुळं १० हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द!

Cyclone Mandous : मंडस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पण यामुळं हवामान बिघडलं असल्यानं चेन्नई एअरपोर्टवरुन १० हून अधिक विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. त्याचबरोबर किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आलं आहे.

हेही वाचा: MPSC Exam : आता तृतीयपंथीयांना पोलीस भरतीत संधी; राज्य सरकारचा हिरवा कंदील

मंडस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. यावेळी चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरम तसेच चेन्नईमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळं कोडाइकनालमध्ये अनेक भागात झाडं रस्त्यावर उन्मळून पडले आहेत.

हेही वाचा: विमानांच्या उड्डाणांबाबत Air India नं केला खुलासा; केबिन क्रूबाबतही स्पष्ट केली भूमिका

तीव्रतेच्या स्वरुपात चक्रीवादळ मंडस गंभीर चक्रीवादळाच्या रुपात तयार झालं आहे. याचा अर्थ असा आहे की, वाऱ्याचा वेग ८९ ते ११७ किमी प्रतीतास इतका असेल. सरकारनं लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे.

हे ही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मंडूस चक्रीवादळाच्या प्रभावामुळं नागपट्टिनम त्रिचीमध्ये वेगानं वारे वाहत असून समुद्रात उंचच उंच लाटा निर्माण झाल्या आहेत. प्रशासन या चक्रीवादळापासून बचावासाठी तयार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. प्रशासानं तामिळनाडूच्या १० जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या १२ टीम तैनात केल्या आहेत.

टॅग्स :CycloneDesh news