NCRB: 2020 मध्ये महिलांविरोधातील गुन्हे 3 लाख 70 हजार

crimes against women
crimes against women Sakal

नवी दिल्ली : सरकारने आता राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्यूरो अर्थात NCRBच्या आकडेवारीचा हवाला देत बुधवारी संसदेत महिलांवरील अत्याचाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी देशभरात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे एकूण 371,503 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये बलात्कार, विनयभंग, हल्ला, हुंड्यासाठी हत्या, शोषण, ऍसिड हल्ला आणि अपहरणाची (rape, outraging modesty, dowry deaths, harassment, acid attacks and kidnappings) प्रकरणे समाविष्ट आहेत. (National Crime Records Bureau - NCRB)

crimes against women
मेट्रोमॅन ई श्रीधरन यांचा राजकारणातून संन्यास; म्हणाले...

भारतातील एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक प्रकरणे ही उत्तर प्रदेश राज्यात आढळून आली आहेत. 49,985 प्रकरणे ही यूपीमध्ये आढळून आली आहेत. यानंतर पश्चिम बंगाल (36,439), राजस्थान (34,535), महाराष्ट्र (31,954) आणि मध्य प्रदेश (25,640) चा क्रमांक लागतो. भारतीय शहरांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 8.3% ने घट झाली आहे. या आकडेवारीनुसार 2020 मध्ये, 398,620 लोकांना महिलांवरील गुन्ह्यांसंदर्भात अटक करण्यात आली होती. 488,143 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि 31,402 जणांना दोषी ठरवण्यात आले होते.

crimes against women
ओमिक्रॉन, डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने होतो संक्रमित; अभ्यासकांचा दावा

सरकारने दिलं हे उत्तर

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राज्यसभेत सीपीआय(एम) च्या खासदार झरना दास बैद्य यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या NCRB च्या रिपोर्टनुसार तसेच बुधवारी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महिलांवर अत्याचार होण्याची अधिकतर प्रकरणे ही पती किंवा जवळच्या नातेवाईकांकडून झालेला अत्याचार (30.2 टक्के) आहेत. यानंतर जबरदस्तीने गैरवर्तन करत महिलांवर झालेले हल्ले हे 19.7 टक्के आहेत तर महिलांचं अपहरण आणि त्यांना बंदी बनवण्याची प्रकरणे 19.0 टक्के आहेत तर बलात्काराची प्रकरणे ही 7.2 टक्के आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com