मेट्रोमॅन ई श्रीधरन यांचा राजकारणातून संन्यास; म्हणाले...

राजकारण सोडताना त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
e shridharan
e shridharan
Updated on

नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी सक्रीय राजकारणातून संन्यास घेतला आहे. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी त्यांनी केरळमधील मल्लपूरम येथे आपला निर्णय घोषित केला.

e shridharan
मनसेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल

राजकारणातून संन्यास घेताना श्रीधरन म्हणाले, "एप्रिल महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्यानंतर त्यातून आपण हा धडा घेतला की, मी कधीही राजकारणी नव्हतो. त्यामुळं मी आता सक्रीय राजकारणातून बाहेर पडत आहे. मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडत असलो तरी राजकारण मागे सोडलंय असा त्याचा अर्थ नाही"

e shridharan
Vijay Diwas: रशियाचे सहकार्य ठरले ‘निर्णायक’

मी सध्या ९० वर्षांचा आहे. राजकारणात पुढे रेटत राहणं हे माझ्यासाठी धोकादायक ठरु शकतं. आता माझी राजकारणासाठी कुठलीही स्वप्न नाहीत. माझ्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी मला राजकारणाची गरज नाही. मी आधीपासूनच माझ्या तीन ट्रस्टच्या माध्यमातून हे कार्य करत आहे, असंही श्रीधरन यांनी म्हटलं आहे.

e shridharan
बैलगाडा शर्यती सुरु होणार; सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या केरळच्या विधानसभा निवडणुकीत ई श्रीधरन यांनी पलक्कड येथून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना आमदार शफी परम्बिल यांच्याकडून पराभव झाला होता. भाजपने या निवडणुकीसाठी मोठी तयारी केली त्यासाठी जनमानसात मानाचं स्थान असणाऱ्या ई श्रीधरन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com