२०१४ पासून ५ लाख कोटींहून अधिक वसुली : मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM-Narendra-Modi

२०१४ पासून ५ लाख कोटींहून अधिक वसुली : मोदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : जेव्हा कोणी बँकेचे कर्ज घेऊन पळून जातो तेव्हा त्याची खूप चर्चा होते. पण जेव्हा धाडसी सरकार पैसे परत आणते तेव्हा कोणीही त्यावर चर्चा करत नाही. गेल्या सरकारच्या काळात कोट्यवधी रुपये अडकून होते. त्यापैकी ५ लाख कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले. ''सिनर्जी फॉर सिमलेस क्रेडीट फ्लो अँड इकॉनॉमिक ग्रोथ'' या परिसंवादामध्ये मोदी बोलत होते.

हेही वाचा: देशात डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य बदलले - पंतप्रधान मोदी

आम्हाला 2014 पूर्वीच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक रस्ते सापडले. आम्ही एनपीए समस्या सोडवल्या, बँकांचे पुनर्भांडवलीकरण केले, त्यांची ताकद वाढवली, IBC सारख्या सुधारणा आणल्या. अनेक कायदे सुधारले, कर्ज वसुलीसाठी न्यायाधिकरण मजबूत केले, असेही मोदी म्हणाले. कोविड दरम्यान, देशात एक समर्पित स्ट्रेस अॅसेट मॅनेजमेंट व्हर्टिकल तयार करण्यात आले. अशा निर्णयांमुळे आज बँकांचे रिझोल्यूशन आणि रिकव्हरी अधिक चांगली आहे. त्यांची स्थिती मजबूत होत असून बँकांची ताकद वाढली आहे, असंही मोदी म्हणाले.

कोणत्याही राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात नवीन झेप घेण्याचा संकल्प करण्याची वेळ येते. मग त्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण राष्ट्राची ताकद एकवटते. भारतातही अशीच ताकद एकवटली आहे. तरीही आपण पूर्ण ताकदीने एकत्र लढायला पाहिजे, असंही मोदी म्हणाले.

loading image
go to top