
मोदी म्हणाले की, मला सिडनी डायलॉगमध्ये संवाद साधण्यासाठी बोलावलं ही बाब भारतीय लोकांसाठी गौरवाची आहे.
देशात डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य बदलले - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द सिडनी डायलॉगमध्ये संबोधित केलं. डिजिटल क्रांतीची पाळेमुळे लोकशाहीत आहेत. देशात डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य बदलले असल्याचं मोदींनी म्हटलं. मोदी म्हणाले की, मला सिडनी डायलॉगमध्ये संवाद साधण्यासाठी बोलावलं ही बाब भारतीय लोकांसाठी गौरवाची आहे.
डिजिटल युगात आपल्या चारी बाजूला सर्व काही बदलत आहे. यामुळे राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजाच्या व्याख्या नव्याने तयार झाल्या आहेत. सरकार, नैतिकता, कायदा, अधिकार आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ताकद आणि नेतृत्वाला नवा आकार देत असल्याचं मोदी म्हणाले.
तंत्रज्ञान हे जागतिक स्पर्धेचं एक साधन बनलं आहे. भविष्यातील आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला यामुळेच बूस्ट मिळेल. तंत्रज्ञान आणि डेटा नविन शस्त्रे म्हणून समोर येत आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे जे काही आहे ते उघडपणे. आपल्या या ताकदीचा दुरुपयोग होऊ दिला नाही पाहिजे असंही मोदी म्हणाले.
सिडनी डायलॉगमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. येत्या काळात आपले संबंध आणखी घनिष्ठ होतील. आपण अंतराळ, विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. मोदी सिडनी डायलॉगमध्ये बोलत आहेत ही ऑस्टलियासाठी गौरवाची गोष्ट असल्याचंही मॉरिसन यांनी म्हटलं. १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत सिडनी डायलॉगचे आयोजन करण्यात आले आहे.