धक्कादायक! कोरोनाकाळात 25 हजारांहून अधिक भारतीयांची आत्महत्या; NCRB चा अहवाल

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग महामारीमुळे त्रस्त असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
NCBR Report About suicide During Corona Period
NCBR Report About suicide During Corona PeriodSakal

नवी दिल्ली : कोरोना काळात बेरोजगारीला कंटाळून किंवा कर्जबाजारीला कंटाळून जवळपास 25 हजार भारतीयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे.

NCBR Report About suicide During Corona Period
Hijab Row: कर्नाटकात शैक्षणिक संस्थांभोवती दोन आठवडे 144 कलम लागू

राय म्हणाले की, ही आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) द्वारे प्रदान केलेल्या डेटावर आधारित असून, 2018-2020 मध्ये बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेकांना आयुष्य संपल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. 25 हजारांपैकी 16 हजार आत्महत्या या बेरोजगारी या एकाच कारणामुळे झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. (NCRB Report About suicide During Corona Period)

NCBR Report About suicide During Corona Period
कोव्हॅक्सिन विकून आयसीएमआर झालं कोट्याधीश

रोजगारासंबंधी दिली माहिती

राज्यसभेत बोलताना रॉय यांनी रोजगारासंबंधी सरकारडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दलदेखील माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, नोकऱ्या शोधणार्‍यांसाठी आणि नोकऱ्यांसाठी रोजगार मिळवणाऱ्यांसाठी राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्प, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे रोजगार आणि उत्पन्नवाढीसाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS), पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दीनदयाळ अंतोदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि भरीव खर्चासह प्रधानमंत्री कौशल विकास योजना आदींसंबंधीची देखील माहिती दिली.

NCBR Report About suicide During Corona Period
वाईन विक्री : अण्णा हजारे करणार आंदोलन; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

बेरोजगारीवरून राहुल गांधीचा हल्लाबोल

दरम्यान, देशातील बेराजगारी संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच केंद्रावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक आहे. यूपीए सरकारने 10 वर्षात 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले होते, तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलले आहे, असा आरोप देखील त्यांनी केला होता. दरम्यान, रॉय यांनी राज्यसभेत दिलेल्या या आकडेवारीनंतर देशातील बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com