MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

Patalkot Express Collision : त्याच वेळी शेजारच्या ट्रॅकवरून ‘पातालकोट एक्सप्रेस’ वेगाने येत होती. रुळांवर उतरलेल्या प्रवाशांना या ट्रेनने धडक दिल्याने किमान ५ जणांचा मृत्यू झाला.
Morena Train Accident 

Morena Train Accident 

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशातील मुरेना येथे रविवारी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. 'उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस'ला आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी रुळावर उड्या टाकल्या पण दुसऱ्या ट्रॅकवरुन येणार एका ट्रेनने अनेक प्रवाशांना धडक दिली यात किमान ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com