Mosquito Killer Apps: मोबाईल ॲप वापरुन डास दूर करता येतात का? जाणून घ्या सत्य

हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर सहज मिळतील
Mosquito
Mosquito esakal
Updated on

सध्या पावसाळा सुरू आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी डासांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे अनेकांना पुरेशी झोप घेता येत नाही. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. परंतु, बहुतेक पद्धती कार्य करत नाहीत. तंत्रज्ञान खूप वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत मॉस्किटो रिपेलेंट ॲपही बनवण्यात आले आहेत. अशी ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर सहज मिळतील. हे ॲप सुरू असताना डास तुमच्या आजूबाजूला नसल्याचा दावा या ॲपच्या सॉफ्टवेअर डेव्हलपरांनी केला आहे.

सर्व ॲपची कार्यशैली जवळपास सारखीच आहे. ॲपबद्दल जे सांगितले गेले आहे त्यानुसार ते कमी वारंवारता आवाज निर्माण करतात. त्यामुळे डास पळून जातात. तुम्ही ॲपमध्ये लो फ्रिक्वेन्सी अल्ट्रासोनिक साउंडही निवडू शकता.

प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) ध्वनी वारंवारतेवर काम करण्याचा दावा

या आवाजांची वारंवारता खूप कमी आहे. यामुळे कोणीही त्याचा आवाज ऐकू शकत नाही. हे सर्व दावे आहेत. हे ॲप वापरणारे याबाबत सांगताना सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आवाजाबद्दल तक्रारही केली आहे.

Mosquito
स्मार्टफोनला 'व्हायरस'पासून वाचवायचं आहे? मग, 'या' 5 सोप्या टिप्स फाॅलो करा

हे ॲप अनेक जाहिरातींसह येतात. यामुळे, थोड्याच वेळात तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील. हे तुम्हाला खूप अस्वस्थ करू शकते. म्हणजेच या ॲपचा मुख्य उद्देश जाहिराती दाखवणे हा आहे, ज्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर’ला कमाई होते. असे ॲप अस्सल नसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com