नेहमी वापरण्यात येणा-या एटीएम मशीनचा शोध कसा लागला माहितीय का....वाचाच त्याचा रंजक इतिहास

atm
atm

एटीएम मशीन आपल्या सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वीप्रमाणे कुणीही बॅंकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत बसत नाही. आज अनेकांना रोख पैशांची गरज भासली तर बॅंकेत न जाता एटीएम मध्ये जावून पैसे काढतात. त्यामुळे अनेकजण सध्या एटीएममध्ये जावूनच पैसे काढण्याला प्राधान्य देतात. एटीएमचा फुलफॉर्म 'ॲटोमेटेड टेलर मशीन' आहे. एटीएमचा जनक म्हणून स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन याचे नांव घेतले जाते. या जॉन यांचा जन्म भारतात २३ जून १९२५ रोजी मेघालयातील शिलाँग येथे झाला होता. विशेष म्हणजे एटीएमचा शोध लावणाऱ्या व्यक्तीचा जन्म भारतातच झाला होता. एटीएमचे जनक अशी त्यांची ओळख झाली आहे. जगातील पहिले एटीएम मशीन २७ जून १९६७ ला लंडनच्या बारक्लेज बँकेत लावण्यात आले. भारतात पहिले एटीएम सन १९८७ मध्ये लावण्यात आले होते. भारतातील पहिले एटीएम हॉंगकॉंग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन(एचएसबीसी) ने मुंबई मध्ये लावले होते. २ सप्टेंबर १९६९ ला ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली झाली. आपल्या नियमित आयुष्यात एटीएम एक महत्वाची गोष्ट बनली आहे. बऱ्याच व्यक्तींच्या वापरात पैसे काढण्यासाठी एटीएम रोज वापरात येणारी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित एटीएम वापरले जरी नसेल तर पाहिले तर नक्की असणार. खूप कमी व्यक्तींना एटीएम विषयी संपुर्ण माहिती असते.

अशी सुचली कल्पना 

जॉन बैरन हे एकदा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते. पण त्यांना बॅकेंत जाण्यास थोडा उशीर झाल्याने तितक्यात बँक बंद झाली होती. त्यावेळी विशेष म्हणजे जॉन शेफर्ड बॅरन हे अंघोळ करताना त्यांना एटीएमची कल्पना सुचली की, बँकेबाहेर असे एखादे मशीन असले पाहिजे की ज्या मशीनमधून २४ तास कधीही पैसे काढता येतील, अशी कल्पना जॉन बेरन यांना आली व ती त्यांनी एटीएम मशीनच्या रूपाने प्रत्यक्षात उतरविली असा एटीएमचा इतिहास सांगितला जातो. 

म्हणून एटीएम पिन चार अंकी करण्यात आला...

प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एक स्त्री असते हा नियम बॅरनलाही लागू होतो. तुमच्या ई-मेल फेसबुक आणि इतर इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हा कमीतकमी सहा अंकाचा असतो, पण एटीएम पासवर्ड चार अंकी असण्यामागे एक रोमांचक कारण आहे. बॅरनने पैसे देणारे मशीन तयार केले पण त्याचा पिन सहा आकडी ठेवावा असे त्याचे मत होते. येथे त्याच्या पत्नीने नकार दिला. त्यांची पत्नी कॅरोलिनला जास्तीत जास्त चार अंकी संख्या लक्षात राहायचा आणि सहा आकडे लक्षात ठेवणे अवघड बनेल असे सांगून त्यांनी पिन चार आकडीच ठेवावा असा सल्ला दिला आणि आजतागायत हा पिन चार अंकीच आहे.

एटीएम मशीन पहिला वापर येथे केला...

एटीएम मशीनचा पहिला वापर लंडनमध्ये २७ जून १९६७ साली बार्कलेज बँकेत केला गेला, तेव्हा त्याला ‘होल इन द वॉल’ म्हणत होते. पण ते बँकेच्या आत होते. तेव्हा प्लास्टिक कार्डचा पैसे काढण्यासाठी उपयोग होत नव्हता, तर त्यासाठी चेकचा वापर होत असे. चेकला कार्बन १४ लावण्यात आला होता, तो मशीनला ओळखत असे, यानंतर पर्सनल आयडंटिफिकेशन नंबर टाकल्यानंतर पिनची चाचणी होत होती. मशीनमधून तेव्हा जास्तीत जास्त १० पाऊंड काढता येत होते. त्यात सुधारणा होत होत आत्ताचे एटीएम अस्तित्वात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com