
एका ४६ वर्षीय महिलेनं होणाऱ्या जावयाशीच लग्न केल्याची घटना घडलीय. याआधी उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महिला होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या घटनेची चर्चा झाली होती. आता बस्ती जिल्ह्यात महिलेनं मुलीचं लग्न एका तरुणाशी ठरवलं होतं. त्या तरुणाशीच ती महिला तासन्तास फोनवर बोलायची. काही दिवसातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा महिलेच्या मुलीला हे समजलं तेव्हा तिनेच तुम्ही लग्न करा मी नंतर कधी तरी लग्न करेन असं सांगितलं.