बाप रे..! साडीसाठी आईने मुलालाच 10व्या मजल्यावर बाल्कनीतून लटकवलं

mother hanged son in balcony
mother hanged son in balcony
Updated on

अनेक उंच इमारतींच्या बाल्कनीतून मुलं पडल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाल्कनीतून वाचवल्याचंही आपण पाहतो. पण एखाद्या आईने आपल्या मुलाला १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून लटकवल्याची घटना तुम्ही पाहिलीयं का?

फरिदाबादमध्ये एका आईने मुलाला इमारतीच्या बाल्कनीत लटकवल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि तेही दहाव्या मजल्यावरून! हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यामध्ये एक मुलगा बेडशीटला लटकून खालच्या मजल्यावर असणाऱ्या बाल्कनीत जातो. याचं कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. एखादी आई असं का वागू शकते? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण नवव्या मजल्यावरील बंद घराच्या बाल्कनीत पडलेली साडी आणण्यासाठी या मुलाला पाठवल्याचं स्पष्ट झालंय. व्हिडीओमध्ये मुलगा बेडशीटच्या सहाय्याने पुन्हा स्वतच्या बाल्कनीत चढत असताना त्याची आई आणि कुटुंबातील इतर स्त्रिया त्याला वर काढताना दिसत आहेत. यासंदर्भात डेली न्यूज हरयाणाने वृत्त दिलं आहे.

फरीदाबादच्या सेक्टर 82 मधील एका सोसायटीत गेल्या आठवड्यात ही घटना घडली. हा व्हिडीओ समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने शूट केला आहे. एका शेजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महिलेने बंद घरातून तिची साडी कशी परत मिळवायची यासाठी कोणाचीही मदत किंवा सल्ला घेतला नाही आणि आपल्या मुलाचा जीव धोक्यात घातला.

हे 6 किंवा 7 फेब्रुवारीला घडली. महिलेने साडीसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालण्याचा निर्णय घेतला. तिने असं काही करण्याआधी सोसायटीतील सेक्रेटरींशी संपर्क साधायला हवा होता. किमान सोसायटीने यासंदर्भात काही निर्णय घेतला असता, असं मत एका शेजाऱ्याने व्यक्त केलंय. ही बाब समोर आल्यानंतर या आईवर प्रचंड टीका होत आहे. अखेर सोसायटीने तिला या घटनेबाबत नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com