सासू-सुनेची जोडी लय भारी! कोरोना लढ्यात ठरतायेत आदर्श

अनेकदा आपण सासू-सुनांमधील भांडणांचे किस्से ऐकतो. मात्र...
Corona
CoronaEsakal

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची (corona patients) संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या या राज्यात ऑक्सिजन सिलेंडर व इंजक्शन यांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. तर, राज्यातील अनेकांनी त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्येच राजकोटमधील (rajkot) सासू-सुनेची एक जोडी अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. अनेकदा आपण सासू-सुनांमधील भांडणांचे किस्से ऐकतो. मात्र, राजकोटमधील सासू-सुनेनी मिळून त्यांच्या आयुष्याची जमापुंजी कोरोनाग्रस्तांसाठी दिली आहे. (mother in law and daughter in law of rajkot donated all ther jewelry and bank balance for corona patients)

Corona
बाप की हैवान! पोटच्या मुलाला विकून पत्नीसोबत फिरला जगभर

राजकोटमधील निर्मला दावडा व त्यांची सून खुशबू दावडा या दोघींनी त्यांचे दागदागिने, कमवलेले पैसे आणि एक ब्लॅक चेक जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. तसंच हा सगळा ऐवज कोरोनाग्रस्तांसाठी वापरा असंही त्यांनी सांगितलं आहे.

निर्मला व खुशबू या शिवणकाम करतात. निर्मला साड्यांना फॉल लावतात. तर, खुशबूने कोरोना काळात मास्क शिवण्यास सुरुवात केली. याच काळात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या व मृतांचा वाढता आकडा पाहता या दोघींनी त्यांच्याजवळील ऐवज कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला.

या दोघींनी त्यांचे दागिने विकून त्या पैशात ऑक्सिजन सेलेंडर खरेदी केला आणि तो कोरोनाग्रस्तांसाठी दिला. तसंच उरलेले पैसे जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केले. कोरोना रुग्णांचे होणारे हाल पहावत नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचं निर्मला यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सासू-सुनेने केलेलं हे कार्य पाहून त्या दोघींना स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मानित केलं पाहिजे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com