esakal | बाप की हैवान! पोटच्या मुलाला विकून पत्नीसोबत फिरला जगभर
sakal

बोलून बातमी शोधा

mother and baby

बाप की हैवान! पोटच्या मुलाला विकून पत्नीसोबत फिरला जगभर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुलं आई-वडिलांसाठी सर्वस्व असतात. त्यामुळे आपल्या मुलांना चांगलं आयुष्य, चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई-वडील कायम कष्ट करत असतात. परंतु, चीनमध्ये एका २ वर्षाच्या चिमुकल्यासाठी त्याचे वडीलच हैवान ठरले आहेत. आपल्या पत्नीची हौसमौज पूर्ण करण्यासाठी या पित्याने चक्क आपल्या मुलाला १८ लाख रुपायांना विकलं. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संबंधित जोडप्याला अटक केली आहे. (shocking the man sold his 2 year old son for go on holiday with his new wife)

चीनमधील Xie नामक व्यक्तीचा आणि त्याच्या पत्नीचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याच्या मुलीचा ताबा पत्नीकडे आणि दोन वर्षाच्या लहान मुलाचा जियाजिया (Jiajia) ताबा Xie यांच्याकडे होता. कायदेशीरित्या घटस्फोट झाल्यानंतर Xie यांनी दुसरं लग्न केलं. मात्र, त्यांच्या पत्नीचे व त्यांचे कायम जियाजियावरुन वाद होत असे. जियाजिया हा आपल्यावर ओझं आहे, अशी तक्रार त्यांची दुसरी पत्नी कायम करायची. इतकंच नाही तर तिला वर्ल्ड टूर करायची आहे. मात्र, जियाजियाचा त्यात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रारदेखील ती करायची. त्यामुळेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी Xie ने त्यांच्या मुलाला १८ लाख रुपयांना विकलं.

हेही वाचा: लस घेतल्यावर हेवी ड्रिंक करताय? वेळीच थांबा, नाहीतर...

Xie नोकरीनिमित्त बाहेर राहत असल्यामुळे त्याने जियाजियाला त्याच्या भावाकडे लिनकडे सोपवलं होतं. त्यामुळे लिन व त्याचे कुटुंबीय जियाजियाचा सांभाळ करायचे. परंतु, काही दिवसांपूर्वी Xie ने जियाजियाला परत आपल्यासोबत घेऊन जात असल्याचं सांगितलं. जियाजियाच्या आईला त्याला भेटण्याची इच्छा असल्याचं सांगत तो जियाजियाला घेऊन गेला. परंतु, बरेच दिवस उलटल्यानंतरही Xie हे जियाजियाला परत घेऊन न आल्यामुळे लिन यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलं. पत्नीला जगभरात फिरायला नेण्यासाठी Xie ने जियाजियाला 158,000 युआन म्हणजे १८ लाख रुपयांनी विकलं होतं.

Xie पैसे मिळावेत यासाठी जियाजियाला जियांग्सू(Jiangsu) प्रांतातील चांगशू (Changshu) या शहरातील एका दाम्पत्याला जियाजियाला विकलं होतं. त्यानंतर मिळालेल्या पैशातून Xie आणि त्यांची दुसरी पत्नी यांनी वर्ल्ड टूर केली. लिन यांच्या पोलिस तक्रारीनंतर सत्य समोर आल्यानंतर जियाजियाला सुखरुप त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे. तर, Xie आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.