mother in law make 67 course meal at andhra pradesh video viral
mother in law make 67 course meal at andhra pradesh video viral

मला पण अशीच सासू हवी; व्हिडिओ व्हायरल...

Published on

हैदराबाद: जावई घरी येणार म्हणून सासूने एक-दोन नव्हे तर तब्बल 67 पदार्थ केले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मला पण अशीच सासू हवी, नशीबवान जावई अशा प्रतिक्रिया व्हिडिओ पाहिल्यानंतर नोंदविल्या जात आहेत.

अनेकजण लाडक्या जावयाची काळजी घेताना दिसतात. मुलीपेक्षा जावयाच्या आवडी-निवडीकडे जास्त लक्ष असते. जावयाला काय आवडते, त्याप्रमाणे पदार्थ तयार करून खायला घातले जातात. सोशल मीडियावर अशाच एका सासूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जावई घरी येणार असल्यामुळे एवढा आनंद झाला आहे की, एक ताट नाही तर टेबल भरेल एवढे पदार्थ तयार केले आहेत. पदार्थ पण अगदी सजवून ठेवले असून, टेबलावर व्यवस्थित मांडणी केली आहे.

संबंधित महिला आंध्र प्रदेशची आहे. आंध्र प्रदेशात जमाई षष्ठी म्हणून परंपरा आहे. या परंपरेनुसार सासू आपल्या जावयाच्या स्वागतासाठी खास पदार्थ तयार करते. या महिलेनेही आपल्या जावयासाठी अनेक पदार्थ तयार केले आहेत. यामध्ये ड्रिंक्स, स्टार्टर्स, चाट, मेनकोर्स आणि मिठाई अशा 5 व्यंजनाचा समावेश आहे. तब्बल 67 पदार्थांची माहिती महिलेने व्हिडिओत दिली आहे.

दरम्यान, टेबलावरील पदार्थ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यामध्ये सासूचा जावई खूप नशीबवान आहे. तुम्हाला दुसरी मुलगी आहे का? मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मला पण अशीच सासू हवी, अशा प्रतिक्रिया नोंदविलेल्या पाहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com