पाच मुलांच्या आईवर पोक्सो, अल्पवयीन भाच्यामुळे गरोदर राहिल्यानंतर 20 वर्षांचा तुरुंगवास

Crime News: अल्पवयीन मुलाने आत्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीय आत्याला घरी ठेवू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी हे आरोप केलेत असं त्याचं म्हणणं होतं.
crime news
crime newsEsakal
Updated on

देहराडून- उत्तराखंडच्या देहराडूनमधील एका महिलेला आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणे महागात पडलं आहे. महिलेला पोक्सो कोर्टाने २० वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, दहा हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आला आहे.(Mother of 5 having affair with 16 year old nephew 20 years imprisonment after pregnancy)

मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अल्पवयीन भाच्यासोबत सावत्र आत्याने लैंगिक संबंध ठेवले होते. पोक्सो कोर्टाच्या न्यायमूर्ती अर्चना सागर यांनी याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलाच्या आईने ५ जुलै २०२२ रोजी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपी महिला आपल्या पतीसोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या माहेरी येऊन राहत होती.

crime news
Nashik Crime : सोशल मीडियावरील त्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल! उपनगर नाक्यावर रास्तारोको करणाऱ्या चौघांना अटक

आत्या झाली गरोदर

आत्याने भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. याशिवाय ती भाच्याला घेऊन पळून गेली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा ती गरोदर होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत आरोपी महिलेला अटक केली होती. गरोदर असल्याने तिला जामीन देण्यात आला. महिलेने एका मुलीला जन्म दिला. बाळाची डीएनए टेस्ट करण्यात आल्यानंतर स्पष्ट झालं की ते भाच्याचेच मुल आहे.

महिलेविरोधात कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कथित पीडित मुलाने कोर्टामध्ये आपली साक्ष बदलली. आपण आत्यासोबत मर्जीने संबंध ठेवल्याचे त्याने कोर्टात सांगितलं. आत्यावरील आरोप त्याने फेटाळून लावले.शिवाय आपले १८ वर्ष पूर्ण असून शाळेत उशिरा दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे शाळेच्या कागदपत्रांवर १६ वर्षे वय असल्याचा उल्लेख असल्याचं त्याने कोर्टात म्हटलं.

crime news
Pune Crime : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

सुनावणीदरम्यान महिलेविरोधात सहा जणांनी साक्ष दिल्या, तसेच १४ कागदपत्रे सादर करण्यात आले. कोर्टाने मुलाचे म्हणणं फेटाळले आहे. महिलेला २० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. महिला अल्पवयीन मुलाचे लैंगिक सुखासाठी शोषण करत असेल तर तो लैंगिक हल्लाच मानला जाईल, असं कोर्टाने म्हटलं.

महिलेला एकूण सहा मुले

अल्पवयीन मुलाने आत्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीय आत्याला घरी ठेवू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी हे आरोप केलेत असं त्याचं म्हणणं होतं. पण, त्याचा फायदा झाला नाही. दरम्यान, महिला ही सहा मुलांची आई आहे. पतीपासून तिला पाच मुलं आहेत. भाच्यासोबतच्या लैंगक संबंधातून तिला सहाव्यांदा मुल झालं आहे. महिला पतीसोबत भांडण असल्याने माहेरी राहायला आली होती. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com