ड्रायव्हिंग लायसनबाबत सरकारचा मोठा निर्णय, मोटार वाहन नियमांमध्ये केला बदल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

शुक्रवारी मोटार वाहन नियमांमध्ये बदल केल्याची अधिसूचना जारी केली. मंत्रालायाने ड्रायव्हिंग लायसनबाबत मोठा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी मोटार वाहन नियमांमध्ये बदल केल्याची अधिसूचना जारी केली. मंत्रालायाने ड्रायव्हिंग लायसनबाबत मोठा निर्णय घेतला असून यामुळे दिव्यांग लोकांनाही आता फायदा होणार आहे. कमी दिसणाऱ्या तसंच कलर ब्लाइंड असलेल्या लोकांनाही ड्रायव्हिंग लायनस या निर्णयामुळे मिळणार आहे. 

मंत्रालयाने म्हटलं की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन (सीएमव्ही) नियम 1989 च्या फॉर्म 1 आणि फॉर्म 1 ए संशोधनासाठी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे कमी आणि मध्यम रंगांधळे असलेल्या नागरिकांना ड्रायव्हिंग लायनस काढता येणार आहे. 

जनतेच्या घामाचा पैसा राजीव गांधी फाउंडेशनकडे वळवला; भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिंव्यांगजन नागरिकांना वाहतूक आधारित सेवा मिळाव्यात यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत. त्यांना ड्रायव्हिंग लायसन मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. आता कलर ब्लाइंड लोकांनाही ड्रायव्हिंग लायसन मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली होती की, कलर ब्लाइंड असलेल्या नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन दिले जात नाही. याबाबत वैद्यकिय तज्ज्ञांकडून, संस्थांकडून मते मागवण्यात आली. त्यांच्या शिफारसीच्या आधारे कमी तसेच मध्यम कलर ब्लाइंड नागरिकांना लायसनसाठी परवानगी दिली आहे. यातून गंभीर दृष्टीदोष असलेल्यांना वगळण्यात आलं आहे. 

मोदीजी घाबरु नका, चीनने आपला भूभाग बळकावल्याचं जनतेला सांगा- राहुल गांधी

वाहन चालवताना चालकाकडे किमान चार कागदपत्रं असणं गरजेचं असतं. त्यामध्ये चालवणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन असायला हवं. तसंच गाडीची नोदंणी झाल्याचं प्रमाणपत्र, इन्श्युरन्स आणि पीयुसी चेक केलेलं असावं. ही कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची झेरॉक्ट प्रत सोबत ठेवता येते. याशिवाय याच्या कॉपी डिजिलॉकर किंवा एम परिवहन या अॅपवरही सेव्ह करता येतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: motor vehicle rules now medium color blind people can get driving licence