प्यार किया तो डरना क्या! खासदारांचा तरुणांना प्रेमविवाहाचा सल्ला

MP Asaduddin Owaisi
MP Asaduddin Owaisie sakal

नवी दिल्ली : ''मुलीला मुलगा आवडला आणि मुलाला मुलगी आवडली तर लग्न करू शकता. तुम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त लग्न करा. प्यार किया तो डरना क्या?'' असं म्हणत खासदार असद्दुीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी तरुणांना प्रेमविवाहाचा सल्ला दिला आहे. याबातचा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विट केला असून ओवैसी यांनी तो व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते तरुणांना संबोधित करताना दिसत आहेत.

MP Asaduddin Owaisi
'ओवैसी बालमित्र, तर मोहन भागवत मामा', रविवारच्या सुट्टीसाठी अभियंत्याचे अजब पत्र

''दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे असेल तर त्यांनी जास्त विचार करू नये. मुलगा प्रामाणिक असेल तर बिनधास्त लग्न करावे. पण, लग्न करताना हुंडा घेऊ नका, हा मोलाचा सल्ला देखील औवेसी यांनी तरुणांना दिला. बाईक, दोनशे किलोची बिर्याणी आणि सोन्याची मागणी मुलीच्या आई-वडिलांकडे करू नका. हुंडा घेताना मला काहीही नको. पण, अम्मा म्हणतेय म्हणून हुंडा द्या, असं म्हणणे चुकीचे आहे. कारण संसार तुम्हाला करायचा असतो. तुमच्या अम्माला नाही'', असंही खासदार ओवैसी म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनिमित्त ओवैसींच्या अनेक सभा होत आहेत. यापूर्वीच झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी चीनवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मोदी चीनबद्दल बोलताना नेहमी घाबरतात. मोदी चहामध्ये देखील 'चिनी' (साखर) घालत नाहीत. त्यामधून चीन बाहेर येईल, अशी भीती त्यांना वाटते, अशा मिश्किल टोला देखील ओवैसी यांनी लगावला. तसेच पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव आणि महागाईबद्दल देखील मोदी एकही शब्द बोलत नाहीत. पाकिस्तानने पुलवामामध्ये हल्ला केला त्यावेळी घरात घुसून मारू, असे मोदी म्हणाले होते. पण, चीनने भारतात घुसखोरी केली असतानाही पंतप्रधान मोदी गप्प बसले आहेत. बिहारमधील लोकांवर हल्ला झाला. पण मोदी एकही शब्द बोलले नाहीत, अशी टीका ओवैसी यांनी केली.यांनी तरुणांना प्रेमविवाहाचा सल्ला दिला आहे. याचा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विट केला असून ओवैसी यांनी तो व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते तरुणांना संबोधित करताना दिसत आहेत.

MP Asaduddin Owaisi
'ओवैसी बालमित्र, तर मोहन भागवत मामा', रविवारच्या सुट्टीसाठी अभियंत्याचे अजब पत्र

''दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे असेल तर त्यांनी जास्त विचार करू नये. मुलगा प्रामाणिक असेल तर बिनधास्त लग्न करावे. पण, लग्न करताना हुंडा घेऊ नका, हा मोलाचा सल्ला देखील औवेसी यांनी तरुणांना दिला. बाईक, दोनशे किलोची बिर्याणी आणि सोन्याची मागणी मुलीच्या आई-वडिलांकडे करू नका. हुंडा घेताना मला काहीही नको. पण, अम्मा म्हणतेय म्हणून हुंडा द्या, असं म्हणणे चुकीचे आहे. कारण संसार तुम्हाला करायचा असतो. तुमच्या अम्माला नाही'', असंही खासदार ओवैसी म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनिमित्त ओवैसींच्या अनेक सभा होत आहेत. यापूर्वीच झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी चीनवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मोदी चीनबद्दल बोलताना नेहमी घाबरतात. मोदी चहामध्ये देखील 'चिनी' (साखर) घालत नाहीत. त्यामधून चीन बाहेर येईल, अशी भीती त्यांना वाटते, अशा मिश्किल टोला देखील ओवैसी यांनी लगावला. तसेच पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव आणि महागाईबद्दल देखील मोदी एकही शब्द बोलत नाहीत. पाकिस्तानने पुलवामामध्ये हल्ला केला त्यावेळी घरात घुसून मारू, असे मोदी म्हणाले होते. पण, चीनने भारतात घुसखोरी केली असतानाही पंतप्रधान मोदी गप्प बसले आहेत. बिहारमधील लोकांवर हल्ला झाला. पण मोदी एकही शब्द बोलले नाहीत, अशी टीका ओवैसी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com