

Madhya Pradesh
esakal
प्रभू श्रीरामांचे जन्मस्थळ अयोध्या आहे हे तर आपल्याला माहितीये. मात्र, त्यांची कर्मभूमी ही मध्यप्रदेशातील ओरछा हे ठिकाण आहे. त्यामुळेच श्री रामांच्या पद स्पर्शांने पावन झालेल्या ओरछा ठिकाणी त्यांचा भव्य दरभार उभारण्यात येणार आहे.
या दरबाराच्या कामाचा आढावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यांनी घेतला. या प्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधित केले. यादव म्हणाले की, श्रीरामचं नावच पुरेसं आहे. जसं नाव, तसेच गुण. श्रीराम आपल्या गुणांनी, वर्तनाने, पितृभक्तीने आणि प्रजेचा रक्षक बनून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम झाले.