

MP CM Yadav Campaigns in Bihar
Sakal
भोपाळ/पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ९ नोव्हेंबर रोजी पूर्व चंपारण जिल्ह्यातील ढाका, चिरैया, नरकटिया आणि मोतिहारी विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार केला. त्यांनी ढाका विधानसभा मतदारसंघात रोड शो करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मतदान करण्याचे आवाहन केले, तसेच अनेक जाहीर सभांना संबोधित केले.