doctor
doctor

VIDEO: कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेत्यानं झापलं; डॉक्टरने दिला राजीनामा

भोपाळ- मध्य प्रदेशातील एका सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरने शनिवारी राजीनामा दिला आहे. एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने काँग्रेसचे माजी मंत्री पीसी शर्मा आणि इतर काही नेत्यांनी त्यांना झापलं होतं. त्यानंतर डॉ. योगेंद्र श्रीवास्तव यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  यासदंर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात काँग्रेस नेते शर्मा, माजी नगरसेवक योगेंद्र चव्हा, डॉ. योगेंद्र श्रीवास्तव यांच्यावर ओरडताना दिसत आहेत. डॉ. श्रीवास्तव हे भोपाळमधील सरकारी जेपी हॉस्पिटलमध्ये कोविड वार्डचे नोडल अधिकारी आहेत. हॉस्पिटलमधील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा सर्व प्रकार घडला. रुग्णाची स्थिती गंभीर असताना त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. 'इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  डॉ. रितीका पांडे यांनी ट्विट करुन सांगितलं की, रुग्ण साडेबारा वाजता रुग्णालयात आला होता. त्याला तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्याच्या कुटुंबियांना रुग्णाच्या प्रकृतीची पूर्ण माहिती होती. आम्ही त्यांना कळवलं की, आयसीयू फूल आहेत, त्यामुळे रुग्णाला दाखल करुन घेऊ शकत नाही. त्यातच एका तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू झाला. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. लोकांनी डॉक्टरांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे, त्यांचे खच्चीकरण करु नये. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी अहोरात्र सेवा केली आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस नेते शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, 'त्यांना डॉक्टरशी असभ्यपणे बोललं नाही. रुग्ण माझ्या मतदारसंघातील असल्याने मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.' सकाळी मी डॉक्टरांशी फोनवरुन बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्याशी बोलण्याचं टाळलं. उलट, रुग्णाला खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला कुटुंबियांना देण्यात आला, असंही ते म्हणाले. 

माझा एक समर्थक डॉक्टरांशी मोठ्या आवाजात बोलला, त्याबाबत मी माफी मागितली आहे.  माझ्या मतदारसंघातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशावेळी कोणत्याही संवेदनशील माणसाला राग येणे साहजिक होतं. एका गरीब रुग्णाला खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. याबाबत कोणी का बोलत नाही, असंही शर्मा म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com