esakal | पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Ventilator_

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांमधील स्थितीही गंभीर बनताना दिसत आहे.

पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांमधील स्थितीही गंभीर बनताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत, शिवाय वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अशात पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले असल्याचा आरोप ससून हॉस्पिटलचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील तक्रार उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर ठीक चालत नाहीत. अनेकदा बंद पडतात, अशी तक्रार तांबे यांनी आढावा बैठकीत केली आहे.  याशिवाय कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटरही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एक मराठी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलंय. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोरोना काळात करण्यात आलेल्या मदतीवरुन वाद निर्माण झाला आहे. त्यातच तांबे यांच्या आरोपामुळे व्हेंटिलेटरच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अधिकअधिक लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. असे असताना केंद्राकडून लशींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय कोरोना काळात योग्य वैद्यकीय मदत किंवा उपकरणे मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राज्यात काही दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेत नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप केलाय.

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

दरम्यान, केंद्राडून महाराष्ट्रासाठी येत्या तीन-चार दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीये. विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला.

राज्यातील कडक लॉकडाउनची तारीख ठरली?

या बैठकीनंतर जावडेकर म्हणाले, "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. पुणेकरांनी लॉकडाउनला जनता कर्फ्यूप्रमाणे स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुणेकरांचे कौतुक केलं पाहिजे. राज्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारमधील संबंधित विभागाशी चर्चा करून राज्यासाठी व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यांपैकी गुजरातमधून सातशे आणि आंध्र प्रदेशमधून 421 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत"