चौहान म्हणाले, अपमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार महुआ मोईत्रावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Mahua Moitra Crime File

चौहान म्हणाले, अपमान खपवून घेतला जाणार नाही; मोईत्रावर गुन्हा

भोपाळ : डॉक्युमेंटरी कालीच्या वादग्रस्त पोस्टरबाबत वक्तव्य केल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना चांगलेच घेरले आहे. आधी पक्ष दूर गेला. नंतर दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आता धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मोईत्रा यांच्यावर मध्य प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MP Mahua Moitra News)

खासदार महुआ मोईत्राने हिंदू देवतांचा अपमान केला आहे. महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे. हिंदू देवतांचा अपमान कोणत्याही किमतीत खपवून घेतला जाणार नाही, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) म्हणाले. कालीच्या वादग्रस्त पोस्टरच्या संदर्भात टीव्ही शो दरम्यान विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात महुआने म्हटले होते की, देवी काली ही मांसाहारी आहे आणि दारू स्वीकारते.

हेही वाचा: महत्त्वाचं खातेवाटप जवळपास निश्चित; कोणाकडं जाणार कुठलं खातं?

महुआ मोईत्राच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे म्हटले होते. महुआवर मंगळवारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बंगाल भाजपने महुआ मोईत्रा यांची पक्षातून हकालपट्टी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीही मुहुआ यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत हा हिंदू देवतांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. यानंतर महुआविरुद्ध भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महुआ मोईत्राविरुद्ध आयपीसी कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे क्राईम ब्रँचचे डीसीपी शैलेंद्र चौहान यांनी सांगितले.

Web Title: Mp Mahua Moitra Crime File Statement Kali Movie Poster Bhopal Madhya Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top