Video: महिला मंत्र्याने 'या' गाण्यावर केला तुफान डान्स...

वृत्तसंस्था
Thursday, 5 December 2019

एका महिला मंत्र्याने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, त्यांनी केलेल्या नृत्यामुळे विरोधकांनी टीकाही सुरू केली आहे.

भोपाळ : एका महिला मंत्र्याने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, त्यांनी केलेल्या नृत्यामुळे विरोधकांनी टीकाही सुरू केली आहे.

मध्य प्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी केलेल्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत इमरती देवी यांनी 'मुझको राणा जी माफ करना...' गाण्यावर डान्स केला आहे. पण, विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे इमरती देवी यांनी नृत्य करणे चुकीचे आहे का?, असे म्हणत मध्य प्रदेश काँग्रेसने पाठराखण केली आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओ डबरा मतदारसंघातील एका लग्नसोहळ्यातला आहे. इमरती देवी या नेहमी चर्चेत असतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्या चर्चेत आल्या होत्या. मंत्री झाल्यानंतर डबरा येथील शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी डॉक्टराची बदली केली तर खर्च जास्त होतो. त्यापेक्षा निलंबित केले पाहिजे, असा निर्णय घेतला होता. हा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp minister imarti devi dance video viral on social media